जिल्हा

१३ हजार फुटांवरून अजित कारभारी यांची आकाशझेप

१३ हजार फुटांवरून अजित कारभारी यांची आकाशझेप
१३ हजार फुटांवरून अजित कारभारी यांची आकाशझेप फोटो: ठाणे वैभव

कल्याणकराची नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कायडायव्हिंग

कल्याण: नेपाळमधील पोखरा येथे अन्नपूर्णा शिखराच्या निसर्गरम्य परिसरात तब्बल १३ हजार फूट उंचीवरून हेलिकॉप्टरद्वारे स्कायडायव्हिंग करत कल्याण शहरातील कोळीवली गावचे सुपुत्र अजित कारभारी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून दिले.

९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान ब्राव्हो इंडिया टीमच्या आयोजनातून झालेल्या या साहसी उपक्रमात अजित यांनी विविध हवाई कसरती आणि पॅराशूट लँडिंगचे कौशल्यपूर्ण सादरीकरण केले.

नेपाळमधील हेली बुगी, पोखरा येथे बी-३ हेलिकॉप्टरमधून समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट उंचीवरून अजित यांनी ही साहसी झेप घेतली. जगातील प्रसिद्ध पर्वतरांगांपैकी एक असलेल्या अन्नपूर्णा शिखराच्या (८,०९१ मीटर) पार्श्वभूमीवर झालेल्या या स्कायडायव्हिंगने त्यांच्या साहसी वृत्तीची आणि तांत्रिक कौशल्याची प्रचिती दिली.

हेलिकॉप्टरमधून झेप घेतल्यानंतर अजित यांनी हवेत फ्रंट फ्लिप, आर्च पोझिशन, अल्टिट्यूड चेक, ३६० अंश टर्न आणि ट्रॅकिंग यांसारख्या विविध हालचाली केल्या. त्यानंतर नियोजित उंचीवर वेव्ह-ऑफ करून पॅराशूट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

पॅराशूटच्या साहाय्याने हवेत ३६०, १८० आणि ९० अंशांचे टर्न घेत तसेच हवेच्या दिशेचा अंदाज घेऊन लँडिंग पॅटर्न पूर्ण केला. योग्य उंचीवर आवश्यक वळणे घेत त्यांनी सुरक्षितपणे जमिनीवर लँडिंग केले.

या आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारतातून ब्राव्हो इंडिया टीमच्या १९ युवक-युवतींनी सहभाग घेतला. आशिया खंडातील प्रसिद्ध हेलिकॉप्टर रेस्क्यू पायलट सुरेंदर यांच्या मार्गदर्शनाखाली स्कायडायव्हिंगच्या जंप पार पडल्या. नेपाळ हेली बुगीचे प्रशिक्षक अलीश थापा आणि मनिष हीराचरण यांनी सहभागी स्कायडायव्हर्सना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचा सन्मान केला.

Article Image


टीम ब्राव्हो इंडियाचे स्कायडायव्हर राहुल डकरे यांच्या मुख्य आयोजनाखाली आणि ओम कटिरा यांच्या सहआयोजनातून हा उपक्रम यशस्वी झाला. युवक-युवतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कायडायव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे, त्यांच्यात साहसी क्रीडाप्रकारांविषयी आवड निर्माण करणे आणि आगामी राष्ट्रीय स्कायडायव्हिंग स्पर्धेसाठी त्यांना तयार करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कल्याणमधील कोळीवली गावातून पुढे आलेल्या अजित कारभारी यांनी नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये केलेल्या या साहसी कामगिरीमुळे त्यांच्या क्रीडाप्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475