जिल्हा

टेंभी नाका नवरात्रौत्सवात यंदा बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती

टेंभी नाका नवरात्रौत्सवात यंदा बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती
टेंभी नाका नवरात्रौत्सवात यंदा बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती फोटो: ठाणे वैभव

ठाणे : ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मानाचे स्थान असलेल्या टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाही ‘आई दुर्गेश्वरी’च्या दर्शनासाठी लाखो भाविकांची पावले टेंभी नाक्याकडे वळणार आहेत.

स्व. आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा उत्सव त्यांच्या पश्चात शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. १९७८ मध्ये सुरू झालेल्या या नवरात्रोत्सवाने तब्बल ४८ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार, कमलेश चव्हाण, पूजा वाघ आदी उपस्थित होतें. टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘आई दुर्गेश्वरी’ची भव्य आणि मनोहारी मूर्ती. देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांची मोठी गर्दी होत असते. 

 काळात देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे मंडपाची भव्य सजावट. उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती यंदा साकारण्यात येत असून, भाविकांसाठी हा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीची भव्यता आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण परिसराला नवरात्रोत्सवाचे वेगळे रूप प्राप्त होणार आहे. ७१ फूट उंच, १०० फूट रुंद आणि ११० फूट लांबी असलेला हा भव्य देखावा आहे. देखाव्याच्या आतल्या बाजूस ३० फुटांची उंची असून देवीचा गाभारा ४० बाय ४० फूट आहे. ५१ खांबांवर हा भव्य देखावा साकारला गेला आहे. २१ दिवस साईटवर आणि प्रत्यक्ष जागेवर मिळून देखावा साकारण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला आहे. जवळपास ३५० कारागिरांनी मिळून या देखाव्याला आकार दिला आहे. ज्येष्ठ कलादिग्दर्शक अमन विधाते  यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बद्रीनाथ मंदिराची निर्मिती होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475