जिल्हा

कल्याणात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेस आक्रमक

कल्याणात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेस आक्रमक
कल्याणात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेस आक्रमक फोटो: ठाणे वैभव

कल्याण : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांचे प्रतीकात्मक रूप साकारत त्यांना बंदी बनवून आंदोलनस्थळी आणले आणि केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. 

यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा तसेच इंडिया आघाडीच्या खासदारांशी संबंधित पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्याबरोबरच निवडणूक व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर काँग्रेसने या आंदोलनातून आक्षेप नोंदवला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनातून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत निषेध व्यक्त करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे कल्याणमधील राजकीय वातावरणात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475