अन्य
येऊरच्या जंगलात आग
येऊरच्या जंगलात आग
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : येऊरच्या जंगलात गुरुवारी मध्यरात्री भडकलेली आग फोफावतच जात असल्याचे निदर्शनास येताच स्थानिक तरुणांनी त्वरेने उपाय केल्यामुळे ती आटोक्यात आल्याचा प्रसंग झाला.
कडक उन्हाळ्यात येऊरच्या जंगलात कधीकधी आग लागते. काहीवेळी ती लगेच शमते तर काहीवेळेस ती भडकते. मध्यरात्रीनंतर आग लागल्याचे ‘जीवो हम् चॅरीटी’ संस्थेचे ज्ञानेश्वर शिरसाठ, तेजस बांगारे, भरत दिवा, प्रकाश कदम या स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग शमवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सुमारे दीड-दोन तास ते आगीशी झुंजत होते. वन विभागाच्या वनपालांना ही घटना कळवली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475