अन्य

हापूस आवक घटल्याने आंब्याच्या दरात वाढ

हापूस आवक घटल्याने आंब्याच्या दरात वाढ
हापूस आवक घटल्याने आंब्याच्या दरात वाढ फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने हापूसचे उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जादा होती, मात्र आता मुख्य हंगामात आवक घटली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत हापुसची प्रतिपेटी २००-५०० रुपयांनी दरवाढ झाली असून चार ते सहा डझन पेटीला २२०० ते पाच हजार रुपये दर आहे. एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडी करता प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होत असते. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झाल्यामुळे पुढील कालावधीत देखील हापूसला सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र यावर्षी अवकाळी पावसाने हापूसच्या पिकावर परिणाम झालेला आहे. मोठ्या प्रमाणात हापुस दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामान बदलाच्या वातावरणाने उत्पादनात घट झाली, त्यामुळे यंदा आवक घटली आहे. एप्रिलमध्ये हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात होत असते. एप्रिल- मे दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होतो, परंतु यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जास्त होती तर आता पुन्हा आवक कमी होत आहे. सोमवारी बाजारात कोकणातील हापुसच्या १८,५२६ पेट्या दाखल झाल्या तर इतर राज्यातील २१ हजार ९४२ पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हापूसची आवक कमी झाली असून त्यामुळे दर वधारले आहेत. आधी दोन ते चार डझनला दोन हजार ते ४,५०० रुपये दर होता, परंतु सोमवारी २,२०० ते पाच हजार रुपयांनी विक्री होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475