जिल्हा

खासदार म्हस्के आणि विचारे यांच्यात जुंपली

खासदार म्हस्के आणि विचारे यांच्यात जुंपली
खासदार म्हस्के आणि विचारे यांच्यात जुंपली फोटो: ठाणे वैभव
ठाणे: कोपरी पुलाच्या कामाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना ' बच्चा है' असे हिणवत संसदरत्नऐवजी वाचाळ रत्न पुरस्कार दिला पाहिजे होता, असा टोला विचारे यांनी लगावला. याचा खरपूस समचार घेत खासदार नरेश म्हस्के यांनीही मी बच्चाच आहे, मोठा होत आहे. पण तुम्ही संसदेत गेलात तेव्हापासून थकलेले आजोबा आहात असे उत्तर दिले आहे. कोपरी पुलाचे काम सुरू असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी राजन विचारे गेले असता त्यांना पत्रकारांनी नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना ‘बच्चा है वह’ असा उल्लेख विचारे यांनी केला. त्यांनी म्हस्के यांच्या कारभारावरही बोट ठेवले. २०१८ साली कोपरी पुलाच्या दुरुस्तीला परवानगी मिळाली. त्यासाठी खासदार असताना आपण पाठपुरावा केला. पण नंतर तीन वर्षे हे काम रेंगाळले. आता रेल्वे आणि पालिकेच्या पाठपुराव्यामुळे कामाला सुरुवात झाली आहे. खासदाराने कामाचा पाठपुरावा केला पाहिजे. सध्या असे होत नाही. म्हणूनच ठाणे स्थानकाचा पुनर्विकासही खोळंबला आहे. आताचे खासदार हे केवळ वाचाळ असून बडबड करण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे त्यांना संसदरत्न नव्हे तर वाचाळ रत्न पुरस्कार द्यायला पाहिजे, अशी टीका करत राजन विचारे यांनी म्हस्के यांना बच्चा म्हणून डिवचले. खा.म्हस्के यांची खरमरीत पोस्ट होय राजन आजोबा, मी बच्चाच आहे आणि मोठा होत आहे. तुम्ही संसदेत गेल्यापासून थकलेलेच आहात. संसदेत तुम्ही ना कधी प्रश्न विचारले, ना ठाण्याच्या लोकांच्या समस्या संसदेत मांडल्या. त्यामुळे संसदरत्न काय भानगड आहे, हे तुम्हाला कळणार नाही. असे म्हस्के यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. ते पुढे लिहितात-तुम्ही लोकसभा हरलात, विधानसभेतही तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला, आता कदाचित महापालिकेतही उभे रहाल, चांगले आहे, माणसाने प्रयत्नवादी असले पाहिजे अशी खिल्ली खासदार म्हस्के यांनी उडवली आहे. इतकेच नव्हे तर मानसोपचार करण्याचा सल्ल्ला दिला आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीतही हाती भोपळा मिळाला तर मानसिक अवस्था वाईट होईल, असे शेवटी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475