जिल्हा
अबब! जेसलपार्क खारफुटीतून काढला १७०० किलो घनकचरा
अबब! जेसलपार्क खारफुटीतून काढला १७०० किलो घनकचरा
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त भाईंदर पूर्वेकडील जेसल पार्कजवळील खारफुटी पट्ट्यातून १५० स्वयंसेवकांनी प्लास्टिक, कपडे, बाटल्या, मूर्ती, भांडी आणि इतर जैवविघटनशील कचरा यासह १,७०० किलो हून अधिक घनकचरा काढला.
हा कार्यक्रम महाराष्ट्र वनविभाग, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, फॉर फ्युचर इंडिया, गो-ग्रीन फाउंडेशन ट्रस्ट, मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.
उपक्रमात (एनएसएस) सहभागी झालेल्यांमध्ये पाटकर कॉलेज, एल.आर.एम.सी. कॉलेज, एल.आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थी होते, जे सर्व त्यांच्या संबंधित एनएसएस युनिटचे प्रतिनिधित्व करीत होते.
मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या स्वीटी खैरे आणि सुचित्रा पालये, एस.आय. पराडकर आणि महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, गो ग्रीन फाऊंडेशनचे सदस्य, आणि युवा कार्यकर्ते जयेश कांबळे, अब्राहम मुरुगन, हर्षल जोशी, साक्षी पवार, अशोक बागरेचा आणि सनय मिश्रा यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475