जिल्हा

मुंब्रा-दिव्यातील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई

मुंब्रा-दिव्यातील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई
मुंब्रा-दिव्यातील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई फोटो: ठाणे वैभव

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत आज मुंब्रा व दिवा परिसरातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली.

मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत आज २१ सप्टेंबर २०२६ रोजी रेतीबंदर मुंब्रा येथील चौपाटी चायजवळील वेटिंग हॉल परिसरात अर्धा इंचाची एक अनधिकृत नळजोडणी, तसेच रेतीबंदर मुंब्रा येथील राणा बंगल्यासमोरील नाल्यामध्ये अर्धा इंचाच्या सात अनधिकृत नळजोडण्या, अशा एकूण आठ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान पीव्हीसी पाईप जप्त करण्यात आला. दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील येडकर नगर नाला परिसरात २५ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. 

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ७ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अनधिकृत नळजोडण्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक २९ व ३३ मधील कल्याण फाटा ते मुंब्रा बायपास दरम्यान गुलिस्तान हॉटेल, भोलेनाथ नगर नाला, अरिहंत फर्निचर, अगासिया नाला परिसर तसेच प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील येडकर नगर नाला परिसरात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १२५ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.

आतापर्यंत दिवा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण १५० अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. कारवाईदरम्यान पीव्हीसी व एचडीपी पाईप सुमारे २,६७० मीटर तसेच अतिरिक्त ५० मीटर पीव्हीसी पाईप जप्त करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475