जिल्हा

पोलीस उपनिरीक्षकाचा अचानक मृत्यू

पोलीस उपनिरीक्षकाचा अचानक मृत्यू
पोलीस उपनिरीक्षकाचा अचानक मृत्यू फोटो: ठाणे वैभव

ठाणे: उपमुख्यमंत्री यांच्या व्हीव्हीआयपी एस्कॉर्ट ड्युटीसाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे (५७) यांचा सोमवारी सकाळी अचानक मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

सांगडे हे कल्याण नियंत्रण कक्षात कार्यरत होते. सोमवारी (२१ सप्टेंबर) ते व्हीव्हीआयपी एस्कॉर्ट ड्युटीसाठी शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना अचानक छातीत दुखणे, घाम येणे आणि चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. कर्तव्यावरील सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना चरई येथील जय आनंद रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेनंतर सांगडे यांचे पार्थिव ठाणे सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ व परिमंडळ-५ यांच्या उपस्थितीत त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. विजय सांगडे हे डोंबिवली येथे कुटुंबासह राहत होते. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

अंत्यविधीच्या वेळी शासकीय मानवंदना देण्याबाबत जुन्नर पोलीस आणि पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475