जिल्हा
परदेशातील मालमत्तेच्या नावाखाली पावणे सहा लाखांची फसवणूक
परदेशातील मालमत्तेच्या नावाखाली पावणे सहा लाखांची फसवणूक
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : परदेशातील मालमत्तेचा वारसहक्क मिळवून देतो असे आमिष दाखवून ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ७२,६०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी खुशीरिद दिन्यार दारुवाला (७२) सेवानिवृत्त, रा. ताडदेव, मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी संजय देशपांडे (५०) राहणार मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व याच्याविरोधात तक्रार आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०१४ पासून ते आजपावेतो विविध ठिकाणचे परदेशातील मालमत्तेचे वारसहक्क मिळवून देतो असे सांगून फिर्यादी तसेच साक्षीदार केदार खराडकर यांच्याकडून वेळोवेळी पाच ७२,६०० रुपये बँक ट्रान्सफरद्वारे व रोख स्वरूपात घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही वारसहक्काबाबत कायदेशीर पूर्तता न करता फिर्यादीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली व रकमेचा अपहार केला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बुनगे करीत आहेत.
300x450
300x600