जिल्हा
कोलशेत येथील हॉटेलकडून ४२ लाखाची वीजचोरी
कोलशेत येथील हॉटेलकडून ४२ लाखाची वीजचोरी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महावितरणच्या भरारी पथकाने कोलशेत येथील 'द रेकडी' या हॉटेलवर छापा मारुन हॉटेल चालकाकडून होत असलेली तब्बल ४२ लाखांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.
या हॉटेल चालकाने महावितरणच्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन रिमोट सर्किटच्या मदतीने मीटरमध्ये होणार्या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्भभरापासून वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. मीटरच्या डेटामध्ये संशयास्पद अनियमितता दिसून आल्यामुळे संबंधित ग्राहकांचे मीटर तपासण्याचे आदेश मुख्य अभियंता संजय पाटील यांनी दिले होते. ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. माणिक राठोड (प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहक प्रतिनिधीसमोर मीटरची तपासणी केल्यावर मीटरमध्ये वीजवापर कमी दाखवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिमोट सर्किट लावल्याचे निदर्शनास आले. हे रिमोट सर्किट वीजचोरी करण्यासाठी लावल्याचे ग्राहक प्रतिनिधी यांनी कबूल केले. मीटरची तपासणी केली असता मीटरमधून गेल्या २४ महिन्यांपासून ११०३९३ युनिटची एकूण ४१ लाख ६६ हजार ७१० वीजचोरी केली असल्यामुळे वीज ग्राहक शिवराम शेट्टी व वीज वापरकर्ता शैलेश डेढिया यांच्यावर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व कलम १३८ अन्वये कोपरी पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475