जिल्हा

७८ वर्षांच्या महिलेच्या स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी

७८ वर्षांच्या महिलेच्या स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी
७८ वर्षांच्या महिलेच्या स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी फोटो: ठाणे वैभव
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांचे मोठे यश ठाणे: स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठे आव्हान ठरतो. आर्थिक ताण, उपचारांची गुंतागुंत आणि मानसिक दबाव यामुळे योग्य वेळी उपचार मिळणेही कठीण बनते. मात्र अशा परिस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकत ७८ वर्षीय महिलेची स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरीत्या काढून जीव वाचवण्यात मोठे यश मिळवले आहे. मॅमोग्राफी स्क्रिनिंग व्हॅनमध्ये तपासणीदरम्यान या वृद्ध महिलेच्या स्तनात संशयित गाठ आढळली. त्वरित तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये दाखल करण्यात आले. अचानक मिळालेल्या या निदानामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. वयानुसार हा आजार धोकादायक ठरू शकतो, असा पहिला अंदाज सर्वांनी व्यक्त केला. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी समुपदेशन करत कुटुंबीयांना धीर दिला. यानंतरच्या इमेजिंग तपासण्या आणि कोर नीडल बायोप्सीमध्ये तिच्या डाव्या स्तनात डक्टल कार्सिनोमा इन सिटू (DCIS) असल्याची पुष्टी झाली. वयोमान लक्षात घेता उपचार अधिक दक्षतेने करण्याची गरज होती. मल्टिडिसिप्लिनरी टीमच्या चर्चेनंतर ब्रेस्ट कंझर्व्हेशन सर्जरी (लम्पेक्टॉमी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. पेरिअरीओलर इनसिजन तंत्राचा वापर करून कर्करोगग्रस्त भाग सुरक्षितपणे काढण्यात आला. सौंदर्य राखण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची जोड देण्यात आली असल्याची माहिती ब्रेस्ट ऑन्को-प्लॅस्टिक सर्जन डॉ. रितिका भंडारी यांनी दिली. या शस्त्रक्रियेमुळे वृद्ध महिलेचे आयुष्य वाचलेच, शिवाय जनतेसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी आरोग्यसेवेची विश्वासार्हता वाढली आहे. मॅमोग्राफी स्क्रिनिंग व्हॅनमुळे लवकर निदान होत आहे आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयात स्तनाच्या कर्करोगासाठी अत्याधुनिक, सुरक्षित व सक्षम शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475