जिल्हा

बीएसयुपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत

बीएसयुपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत
बीएसयुपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत फोटो: ठाणे वैभव
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा * ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ ठाणे: ठाणे महापालिका हद्दीतील जेएनएनयुआरएम आणि बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जेएनएनयुआरएम, बीएसयूपी योजना शहरी गरीबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टयांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यु.पी. सदनिकांमध्ये केले जाते. हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरीता प्रत्येकी ५६ हजार ते १ लाख ३४ हजार इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांकरिता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटूंबांना होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475