जिल्हा

नवी मुंबईत १३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक

नवी मुंबईत १३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक
नवी मुंबईत १३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थविरोधात वाशीमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १३ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवणूक व वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थांसह वाहने व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. यावेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातून आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475