जिल्हा
रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या १२ घोडबंदरवासीयांवर गुन्हे
रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या १२ घोडबंदरवासीयांवर गुन्हे
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रस्ते सुरक्षित करा, अवजड वाहनांसाठी एक मार्गिका तयार करून त्यांची वेळ निश्चित करा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता करा आदी मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या १२ घोडबंदरवासीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कासारवडवली पोलिसांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
घोडबंदर रोड येथील गायमुख चौपाटीजवळ २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमच्या सदस्यांनी जोरदार आंदोलन केले होते. घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहतुकीसाठी एक मार्गिका तयार करुन वेळ निश्चित करा, कोंडीतून घोडबंदरवासीयांना दिलासा द्या, यासंदर्भात हातात पोस्टर घेऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमच्या सदस्यांनी विनापरवाना गायमुख चौपाटीसमोर निदर्शने केली होती. दरम्यान, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत फोरमच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जस्टिस फॉर घोडबंदर रोड' या फोरमचे गिरीश पाटील, राधिका राणे, लक्ष्मी अय्यर, उमेश काळे, निषित रॉय, पंकज सिन्हा, अमित जैन, अनिल डिसोजा, अनिल कुमार, प्रसन्न जोशी, महेंद्र मेनन आणि श्रीकांत चव्हाण या १२ सदस्यांविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन घोडबंदरवासीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475