जिल्हा

११,३२० रिक्त जागा; ३१,७०४ अर्ज दाखल

११,३२० रिक्त जागा; ३१,७०४ अर्ज दाखल
११,३२० रिक्त जागा; ३१,७०४ अर्ज दाखल फोटो: ठाणे वैभव
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ ठाणे : 'आरटीई' अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११,३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१,७०४ अर्ज आले आहेत.‌ १४ ते २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. 'आरटीई' अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर २ फेब्रुवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600