जिल्हा

दिवे-अंजूर येथे १०० मीटर लांबीचा पूल यशस्वीपणे स्थापित

दिवे-अंजूर येथे १०० मीटर लांबीचा पूल यशस्वीपणे स्थापित
दिवे-अंजूर येथे १०० मीटर लांबीचा पूल यशस्वीपणे स्थापित फोटो: ठाणे वैभव

बुलेट ट्रेनचा पहिला स्टील पूल एनएच ३ वर

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात दिवे-अंजूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर (नाशिक महामार्ग) यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. तब्बल १०० मीटर लांब आणि १,४०५ मेट्रिक टन वजनाच्या या पुलाची उभारणी जटिल अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून करण्यात आली.

या पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती राज्यापासून सुमारे १,३०० किमी दूर असलेल्या तमिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आली. तयार स्टील संरचना ट्रेलरच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणून दिवे-अंजूर येथे तिची जोडणी करण्यात आली. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पातील जटिल स्टील संरचनांच्या देशांतर्गत निर्मिती क्षमतेचे उदाहरण म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे. पुलाच्या निर्मितीमध्ये निर्धारित तांत्रिक मानकांनुसार स्टीलची कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग आणि पेंटिंग करण्यात आली. स्टीलच्या प्रत्येक उत्पादन तुकडीची अल्ट्रासोनिक चाचणी (यूटी) करण्यात आली. तसेच वेल्डर आणि पर्यवेक्षकांना आंतरराष्ट्रीय वेल्डिंग तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले.

सुमारे १७.५ मीटर उंचीवरील तात्पुरत्या ट्रेस्टल्सवर २२ स्किड अरेंजमेंट आणि ५४,०७६ टॉर-शिअर टाइप हाय-स्ट्रेंथ बोल्टच्या साहाय्याने पुलाची जोडणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक्स आणि प्री-टेन्शन केलेल्या मॅकॅलॉय बारच्या मदतीने स्वयंचलित यंत्रणेने पूल निर्धारित ठिकाणी सरकवून बसविण्यात आला. महामार्गावरील वाहतुकीला कमीतकमी अडथळा निर्माण व्हावा यासाठी पुलाच्या स्थापनेचे काम रात्रीच्या वाहतूक ब्लॉकमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. पुलासाठी सी-५ प्रोटेक्टिव्ह पेंटिंग प्रणाली आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्जचा वापर करण्यात आला आहे.

जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशातील पहिला ५०८ किमी लांबीची मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहेत. बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात नियोजित २८ पूल बांधण्यात येणार आहेत. यापैकी गुजरामध्ये १७, तर महाराष्ट्रात ११ पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर महामार्ग, द्रुतगती मार्ग, मोठ्या नद्या आणि रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी अशा स्टील पुलांचा वापर केला जाणार आहे. या कॉरिडॉरवर एकूण २८ स्टील पुलांपैकी १६ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475