जिल्हा

भारतीय वंशाच्या वैमानिकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

भारतीय वंशाच्या वैमानिकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण
भारतीय वंशाच्या वैमानिकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण फोटो: ठाणे वैभव

फ्लाय दुबई विमानातील हल्ला प्रकरण

तेल अवीव: दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीच्या विमानामध्ये बुधवारी वैमानिकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हल्ल्यात जखमी झालेले वैमानिक हे भारतीय नागरिक असून त्यांचे नाव स्मित मच्छार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानाचे उत्तर-पश्चिम सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 

इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘फ्लायदुबई’चे ‘एफझेड १०७३’ हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. उड्डाणादरम्यान ही घटना घडल्यानंतर विमान ताबूककडे वळवण्यात आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर मच्छार आणि सह-वैमानिकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मच्छार यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्मित मच्छार यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते जून २०२२ पासून ‘फ्लायदुबई’च्या बोईंग ७३७ ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत ‘स्पाईसजेट’ या विमान कंपनीत तब्बल ११ वर्षे सेवा बजावली आहे. स्पाईसजेटमध्ये ते वरिष्ठ कमांडर होते; तसेच नोव्हेंबर २०२० पासून ते ‘लाइन ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणून इतर वैमानिकांना प्रशिक्षण आणि तपासणीचे काम पाहत होते.

ताबूक विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी विमानाने धोक्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर सुमारे एका तासाने विमानाचे विमानतळावर लँडिंग झाले. ‘फ्लाईट ट्रॅकिंग’ आकडेवारीनुसार, हे विमान अवघ्या ३७ सेकंदांत तब्बल १४,३०० फुटांपेक्षा जास्त खाली आले. त्यानंतर विमानाने अनधिकृत हस्तक्षेपाचा ट्रान्सपॉन्डर कोड सक्रिय केला.

मच्छार यांनी ‘फ्लायदुबई’मध्ये थेट ‘डायरेक्ट-एन्ट्री कॅप्टन’ म्हणून प्रवेश केला होता. त्यांच्या प्रोफाइलवर मुंबईतील ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शाखेची पदवी (जून २००७ ते एप्रिल २००८) घेतल्याचा उल्लेख आहे; मात्र त्यांनी वैमानिकाचे प्राथमिक प्रशिक्षण कुठून पूर्ण केले, याचा तपशील तिथे उपलब्ध नाही.

इस्रायलमधील वृत्त संकेतस्थळ वायनेट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सह-वैमानिकाने फ्लायदुबईचे विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. एका प्रवाशाचा व्हिडीओ समोर आला असून तो म्हणतो, आमच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान आम्ही सह-वैमानिकाला ताब्यात घेतले असून विमान लँड करण्याची तयारी करत आहोत. जे कुणी आम्हाला ऐकत असतील त्यांनी कृपया आम्हाला मदत पाठवावी. आम्ही सौदी अरेबियात विमान उतरवत असून आम्हाला तिथली काही माहिती नाही.

या प्रवाशाने पुढे म्हटले की, पायलट वगळता विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच विमानातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात मुख्य वैमानिक जखमी झालेला दिसत असून त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न प्रवासी करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475