जिल्हा

कचरा व्यवस्थापनासाठी दीड कोटींचा सल्ला

कचरा व्यवस्थापनासाठी दीड कोटींचा सल्ला
कचरा व्यवस्थापनासाठी दीड कोटींचा सल्ला फोटो: ठाणे वैभव

ठाणे: दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद झाले, तरी वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याचे ढिग कायम आहेत. हीच परिस्थिती भंडार्ली क्षेपणभूमीची आहे. या जुन्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिका सुमारे ७९ कोटी रुपये खर्च करणार आहे. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया आणि कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. या सल्लागाराच्या कामासाठीही सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

दिवा डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद झाल्यानंतरही जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटलेला नाही. या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करून जमीन पूर्ववत करण्याची आणि त्यानंतर या जागेवर जैवविविधता उद्यान उभारण्याची योजना मांडण्यात आली आहे. त्या दृष्टीने ठाणे महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावानुसार दिवा आणि भंडार्ली येथील सुमारे आठ लाख ३० हजार मेट्रिक टन जुन्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ७८ कोटी ९८ लाख ६७,६०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी सौराष्ट्र एन्व्हायरो प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेला कार्यादेश देण्यात आला आहे.

जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून पर्यावरणावरील परिणाम कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी मे. मार्स प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे, कामाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवणे, अशी जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475