आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठाण्यात युवासेना आक्रमक

ठाणे : उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील युवासेनेच्या वतीने मंगळवारी ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

जेंटलमन आता मेंटल झाले आहेत, अशी टीका यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ठाण्यातील आनंद आश्रमाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा प्रयोग आदित्य ठाकरे यांनी केल्याने शिवसेनेच्या युवा सैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. युवासेना कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख ऋषीकेश माने, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवा सेना पदाधिकारी नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सत्ता गेल्याने उबाठा गटाच्या नेत्यांना काहीच सुचत नाही, असा टोला युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला.