नवी मुंबईत आता महिला राज

महापौर पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित

नवी मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची मुंबईत आज सोडत निघाली. या सोडतीमुळे अनेकांचे महापौर पदाचे स्वप्न भंगले असून नवी मुंबईही त्यास अपवाद ठरली नाही. आरक्षण सोडतीमध्ये नवी मुंबईत सर्व साधारण महिला आरक्षण पडल्याने भाजप नगरसेवकांमध्ये महापौरपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

१६ जानेवारीला राज्यातील २९, महानगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर गुरुवारी महापौर पदाची आरक्षण सोडत निघाली. यात नवी मुंबई शहरात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीत नवी मुंबईत वैष्णवी नाईक यांचे नाव सोशल मीडियावर सर्वात आघाडीवर चर्चिले जात आहे. त्यापाठोपाठ नेत्रा शिर्के, माधुरी सुतार यांची नावे देखील चर्चेत आहेत. मात्र या शर्यतीत प्रभाग क्रमांक २३च्या नगरसेविका सुजाता पाटील यांच्याकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिले जात आहे.