ठाणेकर अनुभवणार मासुंदा लेक क्रॉसिंगचा थरार

श्री आनंद भारती समाजाचा साहसिक उपक्रम

ठाणे: सुमारे 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ठाणेकरांना परत एकदा मासुंदा तलावात लेक क्रॉसिंगचा थरार अनुभवता येणार आहे.

श्री आनंद भारती समाज आणि युथ हॉस्टेल ऑफ इंडियाच्या ठाणे युनिटने संयुक्तरित्या मासुंदा लेक क्रॉसिंग साहसी उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा साहसी उपक्रम नागेश कोळी, कैलास राठोड यांच्या नेतृत्वाखाली 13 आणि 14 सप्टेंबर रोजी मासुंदा तलावात पार पडणार असल्याचे उपक्रमाचे संयोजक देवेशू ठाणेकर यांनी सांगितले.

२० वर्षांपूर्वी झालेल्या मासुंदा लेक क्रॉसिंग उपक्रमात तेव्हा 87 वर्षे वय असणाऱ्या दिवंगत अनंत कोळी यांनी लेक क्रॉसिंगचा थरार अनुभवला होता. प्रिसिझन फिशरीजच्या सहकार्याने होत असलेल्या या उपक्रमादरम्यान सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे. सहभाग निश्चित करण्यासाठी सुरेखा मळेकर (9869382562) किंवा सुचिता मोरेकर ( 9869266021) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री आनंद भारती समाजाचे कार्यवाह संदीप कोळी यांनी केले आहे.