ठाणे: आर्थिक दुर्बल आणि एकल महिलांना स्वयं रोजगाराची संधी देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा अनोखा उपक्रम
ठाणे महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकाकी महिलांच्या स्वयं रोजगारासाठी धर्मवीर आनंद दिघे स्वयं रोजगार योजना राबवली असून त्याचा लाभ ठाण्यातील दहा हजारहून अधिक महिलांना झाला आहे.
ठाणे महापालिकेने धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अर्ज मागवले. अवघ्या महिन्याभरात तब्बल १३,६३८ अर्जांचा पाऊस पडला. त्यामुळे पालिकेनेही या योजनेसाठी १८ कोटींचा निधी मंजूर करून या योजनेला अखेर सुरुवात केली. या योजनेंतर्गत सुमारे ४,८३० शिलाई मशीन आणि ५,२५८ घरघंट्यांचे वापट सुरू झाले आहे. या योजनेतंर्गत सर्व प्रभाग समित्यांमधील लाभार्थ्यांना ४,४३० शिलाई मशीन आणि ५२५८ घरघंटीचे वाटप करण्यात येणार आहे.
प्रभागनिहाय लाभार्थी
प्रभाग | शिलाई मशीन | घरघंटी |
वागळे | ५९८ | ६८० |
लोकमान्य | १०१३ | १२७१ |
वर्तकनगर | ३६५ | ३८७ |
माजिवाडा | ५०५ | ५३० |
उथळसर | १९२ | २२६ |
कळवा | ५४३ | ५९० |
मुंब्रा | ५०८ | ४०७ |
दिवा | ३६३ | ३७६ |
कोपरी | ७४३ | ७९१ |