अंबरनाथ : राज्यातील महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे या मागणीसाठी अंबरनाथ आणि उल्हासनगरला महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, जिल्हा संघटिका अंजली राऊत यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
कल्याण लोकसभा क्षेत्रामधील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.