मानपाडा हद्दीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे हस्तगत

कल्याण : मानपाडा पोलीस स्टेशनचे गस्ती पथक मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अडीवली पिसवली येथील यासीन खान या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहीत मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ व तपास पथकाचे अंमलदार यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुस मिळुन आले.

यासीन खान (३०) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा व ४०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस असा एकूण 10 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मागर्दशनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, सहायक पोलिस उप निरीक्षक पवार, हवालदार मासाळ, पाटील, शिपाई आहेर, आव्हाड, शेळके यांनी केली आहे.