कल्याण-विठ्ठलवाडी-कर्जत विभागात आरओबी खुला

अधिक सुरक्षितता, गाड्यांचा वेग वाढणार

ठाणे : कल्याण-विठ्ठलवाडी-कर्जत विभागात रोड ओव्हर ब्रीज कार्यान्वित करण्यात आला असून, हा पूल लेव्हल क्रॉसिंगच्या बदल्यात खुला झाला. हा आरओबी एमयूटीपी 3 ए प्रकल्प (मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प) अंतर्गत मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीद्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे.

हे लेव्हल क्रॉसिंग गेट बंद केल्याने आणि रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) फ्लायओव्हर चालू केल्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा कमी होईल.यामुळे प्रत्येक ट्रेनची सरासरी १-२ मिनिटांची बचत होईल.

मानवी लेव्हल क्रॉसिंग गेट कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यानचा 1अ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आता या नवीन फ्लायओव्हरचा पर्याय रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे कल्याण- विठ्ठलवाडी-उल्हासनगर आणि उल्हासनगर-अंबरनाथ विभागातील सलग ५ किलोमीटरचा भाग कोणत्याही लेव्हल क्रॉसिंग गेट्सपासून मुक्त झाला आहे.
यामुळे या विभागातील उपनगरीय लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांची अधिक सुरक्षितता आणि वक्तशीरपणा सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल, शिवाय यामुळे या विभागातील गाड्यांचा वेग वाढण्यासही मदत होणार आहे.

या मार्गावर रोज २२४ उपनगरीय लोकल ट्रेन (अप + डाऊन), 80 मेल एक्सप्रेस (अप +डाऊन)आणि 20 मालगाड्या (अप+ डाऊन या विभागात धावत आहेत शिवाय या विभागात एकूण 324 गाड्या (अप +डाऊन) दररोज धावतात.

कल्याण- बदलापूर रस्ता आणि त्या भागातील कुर्ला कॅम्प रस्ता यांना जोडणा-या या विभागातील रस्ते वाहतुकीसाठी हे 1अ लेव्हल क्रॉसिंग गेट सर्वात व्यस्त गेट होते. या फाटकावरील सातत्याने होणारी अवजड रस्ते आणि रेल्वे वाहतुकीमुळे गेट वारंवार बंद/उघडल्याने उपनगरीय लोकल/मेल एक्सप्रेस आणि रस्त्यावरील वाहनांना खोळंबा होत होता.

या एलसी गेटची एकूण युनिट वाहने (टीयूव्ही) वार्षिक 6,73,004 होती. यामुळे कल्याण उपनगरातील सर्वात वर्दळीचे गेट आहे. मुंबई विभागातील दिवा लेव्हल क्रॉसिंग गेट 8,53,358 च्या टीयूव्हीसह सर्वात व्यस्त लेवल क्रॉसिंग गेट आहे. विठ्ठलवाडी लेव्हल क्रॉसिंग गेट हे दिवा एलसी गेटसारखे 6,73,004 च्या टीयूव्हीएवढेच व्यस्त आहे.

टीयूव्ही हे पर्टिक्युलर गेटवरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या व्यस्ततेचे मोजमाप करणारे एकक आहे. त्या विशिष्ट लेव्हल क्रॉसिंग गेटमधून जाणारे एकूण रस्ते आणि रेल्वे वाहनांची ही गणना आहे. ०1 हे लेवल क्रॉसिंग गेट बंद केल्याने गेटमन म्हणून रेल्वेच्या ३ कर्मचारी मनुष्यबळाची तैनातीही वाचली, त्यामुळे महसुलाची बचत झाली.

आरओबी उड्डाणपूल बांधण्याचे काम 10 जुन 22 रोजी सुरू झाले आणि 8 आॅगस्ट 23 रोजी काम पूर्ण झाले. आरओबीची किंमत 17 कोटी रुपये असून, त्याचा ब्रिज स्पॅन 36 मीटर आहे. येथील फ्लायओव्हरवर चालण्यासाठी फूटपाथही प्रदान केला असून त्याची रुंदी 1.5 मीटर इतकी आहे.