ऋतू ग्रुपचे संचालक मुकुंद पटेल यांचे कौतुकोद्गार
ठाणे : बांधकाम व्यवसायात चॅनेल पार्टनर यांचा सिंहाचा वाटा आहे. ते या क्षेत्राचे अविभाज्य घटक आहेत. आम्ही जरी घरे बांधत असलो तरी या क्षेत्राचे खरे नायक चॅनेल पार्टनर आहेत, असे मत ऋतू ग्रुपचे संचालक मुकुंद पटेल यांनी कल्याण येथे आयोजित केलेल्या चॅनेल पार्टनर सत्कार सोहळ्यात केले.
भारताच्या ३.३. ट्रिलियन अर्थ व्यवस्थेत ७.५ टक्के वाटा हा बांधकाम क्षेत्राचा आहे. या क्षेत्रावर २५० पेक्षा अधिक उद्योगधंदे अवलंबून आहेत. खरीदी-विक्री जर सुरळीत सुरु राहिली तरच हे सर्व धंदे तग धरू शकतात. अशा परिस्थितीत या व्यवसायाला खरी चालना मिळत असते ती ब्रोकर अर्थात चॅनेल पार्टनरमुळे. बांधकाम क्षेत्रात कोणतेही आव्हान आले तरी ही मंडळी अहोरात्र मेहनत करत हा व्यवसाय स्थिर ठेवण्याचे काम यशस्वीपणे करीत असतात, असे मत श्री. पटेल यांनी व्यक्त केले.
लग्न जुळवून देणाऱ्या मंडळींना जसे वधू आणि वर परिवाराकडून महत्व प्राप्त झाले आहे तसेच महत्व चॅनेल पार्टनर मंडळींना अलीकडे प्राप्त झाले आहे. घर घेण्याच्या मोठ्या निर्णयात ही मंडळी बांधकाम व्यवसायिक आणि ग्राहकांमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. एखादा ग्राहक आपल्या आयुष्याची जमा केलेली संपूर्ण पुंजी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्च करत असतो, त्याचबरोबर आपले पुढील २५-३० वर्ष आयुष्य सोयी-सुविधेत जावे यासाठी आपल्या परिवारासाठी तो सर्वात उत्तम पर्यायाच्या शोधात असतो. अशावेळी घराचा योग्य निर्णय घेण्यासाठी चॅनेल पार्टनर अचूक मार्गदर्शन करतो आणि ग्राहकाला पुरेपूर समाधान देत असतो. त्यामुळे अशा मंडळींचे ग्राहकांनी देखील तितकेच आभार व्यक्त केले पाहिजेत, असे देखील श्री. पटेल पुढे म्हणाले.
ऋतू ग्रुप गेली ४४ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर त्यांनी ४० पेक्षा अधिक गृहप्रकल्प ठाणे, कल्याण आणि मुंबई परिसरात साकारले आहेत. नुकतीच त्यांना कल्याणमध्ये काम सुरु करून १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने त्यांनी कल्याण येथील ५५ चॅनेल पार्टनरचे सत्कार केले. त्याचबरोबर या चॅनेल पार्टनरच्या यशावर आधारित ‘ठाणेवैभव’ने साकारलेल्या ‘रिअल हिरोज’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन देखील माजी नगरसेवक आणि कल्याण रिअल इस्टेट ब्रोकर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वायले आणि ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण येथील आधारवाडी परिसरात ऋतू ग्रुप गेली १२ वर्षे काम करीत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचे भूमीपुत्रांशी संबंध घट्ट आहेत, त्यामुळे त्यांना सर्वांचे सहकार्य कायम लाभत असते, असे मत श्री.वायले यांनी मांडले. ऋतू ग्रुप केवळ घर बांधत नसून त्यांचे सामाजिक काम इतके मोठे आहे कि खरे तर ते समाज बांधण्याचे काम करीत आहेत, असे मत श्री.बल्लाळ यांनी व्यक्त केले.
ऋतू ग्रुपचे मुकुंद पटेल यांचे जुने आणि निकटचे सहकारी लक्ष्मण शिंदे, जितू पटेल, विशेष पटेल, उदय आचार्य, हाशिम खतरी, विनिता पाटील आदी उपस्थित होते. त्याचबरोबर ऋतू ग्रुपचे संचालक ऋषी पटेल यांनी व्हिडिओमार्फत सर्व चॅनेल पार्टनरशी संवाद साधला.
यावेळी चॅनेल पार्टनर दीपक श्रीवास्तव-ओम साई इस्टेट एजंट, प्रफुल्ल पवार-ओम साई इस्टेट कन्सल्टंट, सोनाली वाळंज-हार्दिक इस्टेट कन्सल्टंट , सचिन टाक-ड्रीम होम रियल इस्टेट सोल्युशन्स, यशवंत धानके-श्री समर्थ हाऊसिंग एजन्सी, सतीश सुर्वे-वास्तु रिअलिटीज, उमेश शिर्के-ड्रीम डेस्टिनेशन, सुनिल अहिरे-अहिरे इस्टेट, विजय विसपुते-विसपुते रिअल इस्टेट एजन्सी, संकेत तन्ना-तन्ना असोसिएट, दिपक चौधरी-दीपक कन्सल्टन्सी, अमित शिंदे-प्राईम प्रॉपर्टीज, अनिल विंचुरकर-अनिल प्रॉपर्टीज, रविंद्र शिंदे-श्री प्रॉपर्टीज, मनिष गांधी-बालाजी इन्वेस्टमेंट्स, सचिन आखाडे-आर. एस. प्रॉपर्टीज, राजेश मोरे-आर. एम.प्राईम प्रॉपर्टीज, विराज ठाकरे-विराज एंटरप्रायजेस, संतोष पवार-मातृछाया प्रॉपर्टी, रणविजय सिंग-महावीर इस्टेट कन्सल्टन्सी, श्रीनिवासन अय्यर-ओम शक्ती कन्सल्टंट, चेतन बोरसे-श्री साई प्रसाद इस्टेट एजन्सी, रविंद्र अग्रवाल-एम.के.इस्टेट कन्सल्टंट, श्यामकांत येवले-श्री समर्थ इस्टेट कन्सल्टंट, संजय मालवे-श्री साई इस्टेट कन्सल्टंट, यशवंत मोरे-यश इस्टेट कन्सल्टंट, बापू कोळी-इंडिव्हिज्युअल रिअल इस्टेट कन्सल्टंट, सुशील पांडे-ग्लोब प्रॉपर्टीज, मोहित चंदवानी-ओम डिल रिअल इस्टेट, जयराम रहेजा-न्यू होम्स इंडिया, घनश्याम विरवानी-आनंद हाऊसिंग एजन्सी, सचिन महाजन-ओम साई कन्सल्टन्सी, रवी थोरात-प्रॉप टायकून, चंद्रकांत दलभंजन-गुरुकृपा इस्टेट एजंट, सचिन रांजणे-ओम साई रिअल इस्टेट डेव्हलपर्स, राजेश बजाज-हिया सोल्युशन्स, अभिषेक खानविलकर-माय होम रिअल इस्टेट, अजय पाटकर-पाटकर इस्टेट कन्सल्टन्सी, प्रकाश कुकरेजा-श्री गणेश रिअल इस्टेट कन्सल्टंट, कल्पेश तिलावत-एस.के.इस्टेट कन्सल्टंट, जयकुमार-रिलायबल इस्टेट, शिवपूजन तिवारी-सुषमा इंटरप्राईजेस, सिकंदर मढवी-साई वरद इस्टेट एजंट, मकरंद ताम्हाणे-ताम्हाणे इस्टेट एजन्सी, शांताराम डुंबरे-डुंबरे इस्टेट, शैलेंद्र शुक्ला-दिशा इंटरप्राईझेस, सचिन तोरणे-सेंटीमेंट रिअल इस्टेट, अनिल भणगे-फेम कन्सल्टन्सी, अभिषेक हुलवान-अभिषेक रिअल इस्टेट एजन्सी, तानाजी चव्हाण-त्रिमूर्ती इस्टेट एजन्सी, सौरभ गुप्ता-एस. जी. रिअल इस्टेट, अमित पाठक-आदित्य रिअल इस्टेट, पियुष जैन-श्री इस्टेट कन्सल्टंट, सागर ढाणे-सागर इस्टेट आणि शशी कुमार-सिद्धी होम्स या मंडळींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘ठाणेवैभव’ची इव्हेन्ट कंपनी आर्ट ६५ आणि ऋतू ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच पुरवणीचे शब्दांकन आणि संकलन प्रशांत असलेकर आणि स्वरूप हुले यांनी केले.