ठाणे: महाराष्ट्र पोलीस क्रिडा अधिकारी, मदतनीस, ठाणे शहर पोलिस उपनिरीक्षक ठाणे शहर डॉ. स्नेहा करनाळे यांनी लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस फायर गेम्समध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून ठाणे शहराच्या लौकिकात भर घातली.
२७ जून ते ६ जुलै दरम्यान अमेरिकेतील बर्मिंगहॅम अलाबामा येथे पार पडलेल्या लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस फायर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या डॉ.स्नेहा करनाळे यांनी वुमेन फिजिक (बिकनी) या क्रिडा प्रकारात सुवर्णपदक आणि बॉडीबिल्डिंग या क्रिडा प्रकारामधे रौप्य पदक पटकावले. या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलासह ठाणे शहर पोलिसांचा सन्मान जगात झाला आहे. या स्पर्धेमध्ये ७३ देशांनी सहभाग नोंदाविला होता. यापूर्वीही डॉ. स्नेहा कारनाळे यांनी आंतराराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाची कमाई करुन भारत देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे.