ठाणे : शहरात सुरू असलेली रस्ते कामांची, साफ सफाई कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. या दरम्यान कामांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या कामाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यकारी अभियंता यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस तर ठेकेदाराला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात (22 मे रोजी) ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात वसंत विहार येथील कॉनवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटी रुपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर उर्वरित ३९१ कोटी रुपयांच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी देखील मा. मुख्यमंत्री यांनी केली.
वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील रस्ता दुभाजक आणि हरित जनपथात अनेक ठिकाणी झाडे लावून सुशोभिकरण करणे अपेक्षित असताना मोकळ्या जागा निदर्शनास आल्या. रस्ता दुभाजक आणि हरित जनपथात अनेक ठिकाणी गवत/ तण नियमित काढले न गेल्याने त्याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे दिसून आले. झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मे. पायोनिअर आऊटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त श्री. बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रस्ते साफसफाई ठेकेदारालाही नोटीस वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या पवार नगर येथील रस्ते साफसफाईचा ठेका व्यंकटेशा या कंपनीस देण्यात आलेला आहे. परंतु नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई न करणे. तसेच रस्त्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना गणवेश, तसेच इतर सुरक्षा साधने दिले नसल्याचे आढळून आले. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदर ठेकेदाराच्या कामकाजात सुधारणा करणेकरीता सक्त ताकीद आली असून कामकाजात अपेक्षीत सकारात्मक सुधारणा न झाल्यास आपले कंत्राट मुदतपूर्व संपुष्टात आणून आपणास काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी नोटीशीद्वारे दिले आहेत.
महापालिका क्षेत्रातील उद्याने अद्ययावत रहावीत यासाठी ठेकेदार पध्दतीने जाहिरातीच्या बदल्यात उद्यान, चौक व ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. मे. पायोनिअर आडटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. कंपनीला वर्तकनगर प्रभागसमिती गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील दुभाजक व हरित जनपथाची निगा देखभाल करणे. मे. रोनक ॲडर्व्हटायझिंग या कंपनीला एमएमआरडीए व एमएसआरडीसी ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे, ठाणे शहरातील 50 चौक तसेच ठाणे स्थानक परिसर सुशोभित करणे. मे. ॲड स्पेस पब्लिसिटी एलएल पी यांना जेल तलाव ते गोल्डन डाईज नाका, तीन पेट्रोल पंप ते मखमली तलाव, भास्कर कॉलनी ते नौपाडा प्रभाग समिती येथील ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे. तसेच सारथी ॲडर्व्हटायझिंग यांना रमाबाई आंबेडकर उद्यान सुशोभिकरणाचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार उद्यानांची दैनंदिन निगा व देखभाल योग्यप्रकारे राखली न गेल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्री. बांगर यांनी दिला आहे.
ठेकेदाराला 5 लाखांचा दंड
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर, लोकमान्य- सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, कळवा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरणाने पुर्नपृष्ठीकरणाचे काम मे. आर.पी. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामादरम्यान कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आढळून आलेल्या नाहीत. मास्टीक, अस्फाल्ट पध्दतीने करावयाच्या डांबरीकरणाच्या कामाध्ये काम करणाऱ्या मजदूरांना, सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी शूज, हॅण्डग्लोज, हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात आलेले नसल्याचे दिसून आले त्यामुळे या…