नायट्रो फिटनेसच्या योग दिन उत्सवाने ठाणेकरांमध्ये पसरले चैतन्य

ठाणे: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, ठाण्यातील सुप्रसिद्ध नायट्रो फिटनेसकडून एका मॉलमध्ये भव्य आरोग्यदायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला एकच गर्दी करत सकाळी ८ वाजता एकत्र येऊन योगा आणि झुंबा सत्रांचा अनुभव घेतला.

या कार्यक्रमात ‘नायट्रो’च्या व्यावसायिक प्रशिक्षकांनी विविध योगासने शिकवली, ज्यामुळे उपस्थितांच्या शरीराला लवचिकता, मन:शांति आणि सकारात्मक ऊर्जा लाभली. योग सत्रानंतर झालेल्या झुंबा सेशनने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

या कार्यक्रमामागे नायट्रो फिटनेसचे सर्वेसर्वा प्रबोध डावखरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. ठाण्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत फिटनेस पोहोचवणे आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याविषयीची जाणीव निर्माण करणे, या मुख्य हेतूने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

“फिटनेस ही फक्त सवय नसून एक मानसिकता आहे. अशा सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ही मानसिकता शहरात पसरवत आहोत,” असे प्रबोध डावखरे सांगतात.

योगदिनाचा हा उत्सव केवळ एक आरोग्य कार्यक्रम न राहता, ठाणेकरांसाठी एक आरोग्य चळवळ ठरली. यामध्ये सहभागी झालेल्यांना शरीर-मन-आत्मा यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.