न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या आशांवर पाऊस पाणी सोडणार?

Photo credits: Samuel Rajkumar/Reuters

न्यूझीलंडचे उपांत्य फेरीत खेळणे जवळपास निश्चित झाले होते, तथापि, गेल्या २० दिवसांत किवीससोबत असे काही घडले कि त्यांचे या महास्पर्धेत पुढे जाणे अवघड झाले आहे. त्यांनी त्यांचे पहिले चार सामने जिंकून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली, परंतु पुढील चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकाच्या मागील आवृत्तीतील अंतिम फेरीत खेळलेल्या न्यूझीलंडचा सामना ९ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी होणार आहे. ‘ मस्ट विन’ अशा परिस्थितीत असलेल्या न्यूझीलंडसमोर श्रीलंकेचं खडतर आव्हान आहे कारण हे दोन्ही संघ जेव्हा भारतात खेळलेले तेव्हा तीनही वेळा न्यूझीलंड पराभूत झाले. याशिवाय, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. जर पाऊस पडला आणि सामना झाला नाही तर दोन्ही संघांना एक-एक अंक मिळेल आणि न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या अशांवर पाणी पडू शकेल.

न्यूझीलंड आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनी १९७९ पासून एकमेकांविरुद्ध १०१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने ५१ जिंकले आहेत, श्रीलंकेने ४१ जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि आठ सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी तीन एकदिवसीय सामने खेळले असून ते सर्व श्रीलंकेने जिंकले आहेत. विश्वचषकात, त्यांनी ११ सामने खेळले आहेत, ज्यात न्यूझीलंडने पाच आणि श्रीलंकेने सहा जिंकले आहेत.

  न्यूझीलंड श्रीलंका
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ५१ ४१
भारतात
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील न्यूझीलंड आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी

न्यूझीलंड आणि श्रीलंका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला नववा आणि शेवटचा साखळी सामना खेळतील. आठ सामन्यांपैकी न्यूझीलंडने चार जिंकले आहेत, तर श्रीलंकेने दोन जिंकले आहेत. न्यूझीलंडने त्यांचे ५०% सामने जिंकले असले तरी, त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ते त्यांच्या शेवटच्या सलग चार सामन्यात पराभूत झाले आहेत.

सामना क्रमांक न्यूझीलंड श्रीलंका
इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १०२ धावांनी पराभव
नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव पाकिस्तानकडून ६ विकेटने पराभव
बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेटने पराभव
अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव नेदरलँड्सचा ५ विकेटने पराभव
भारताकडून ४ विकेटने पराभव इंग्लंडचा ८ विकेटने पराभव
ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव अफगाणिस्तानकडून ७ विकेटने पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १९० धावांनी पराभव भारताकडून १०० धावांनी पराभव
पाकिस्तानकडून २१ धावांनी पराभव (डीएलएस प्रणाली) बांगलादेशकडून ३ विकेटने पराभव

 

संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

श्रीलंका: कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा

Photo credits: Reuters

 

 

 

 

 

दुखापती अपडेट्स

न्यूझीलंड आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यापूर्वी दुखापतीची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. दोन्ही संघांनी येथे प्रत्येकी एक सामना खेळला आहे. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला, तर न्यूझीलंडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. मैदानाची लहान परिमाणे पाहता, भरपूर धावा होण्याची अपेक्षा करा.

 

हवामान

हवामान बहुतांशी ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ८६% असेल. पावसाची ९०% शक्यता आणि वादळाची ५४% शक्यता असेल. ईशान्येकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

रचिन रवींद्र: न्यूझीलंडच्या या सलामीच्या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये ७५ च्या सरासरीने आणि १०७ च्या स्ट्राइक रेटने ५२३ धावा केल्या आहेत. तो त्याच्या डाव्या हाताच्या फिरकीसह गोलंदाजीचा पर्याय देखील देतो.

मिचेल सँटनर: न्यूझीलंडचा हा डावखुरा फिरकी गोलंदाज आठ सामन्यांत १४ विकेटसह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. याशिवाय, तो खालच्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो.

सदीरा समरविक्रमा: श्रीलंकेचा हा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज ६२ च्या सरासरीने आणि १०२ च्या स्ट्राइक रेटने ३७२ धावा करून त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

दिलशान मधुशंका: श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तो आठ सामन्यांमध्ये २१ विकेटसह आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एक फोरफर आणि एक फायफर देखील आहे.

 

 आकड्यांचा खेळ

  • चरिथ असलंका त्याचा ५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे
  • टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ५० धावांची गरज आहे
  • डॅरिल मिचेलला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १०० धावांची गरज आहे
  • महीष थीकशानाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे
  • अँजेलो मॅथ्यूजला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करण्यासाठी १०० धावांची गरज आहे
  • सदीरा समरविक्रमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी १३ धावांची गरज आहे
  • ट्रेंट बोल्टला विश्वचषकात ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे

 

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख:  ९ नोव्हेंबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)