राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बैलगाडीतून नगरपालिकेत दाखल

बदलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी नगरपालिका कार्यालयापर्यंत बैलगाडीतून प्रवास करत पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा निषेध नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाचा वापर कमी करा, खाद्यतेल जपून वापरा, परदेश दौरे टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आदिसारखे काटकर करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे, या आवाहनाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेश सरचिटणीस यांनी बैलगाडीतून प्रवास करत नगरपालिका कार्यालय गाठले.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्गाने देखील सार्वजनिक वाहतुकीचा अथवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इंधनाचा वापर कमी करा काटकसरीचा देशवासीयांना दिलेला सल्ला योग्य असला तरी त्याची सुरुवात केंद्र सरकारने भाजपाशासित राज्यांनी करावी, अशी मागणी सरचिटणीस देशमुख यांनी केली आहे.