१०७ मोबाईलसह ५० लाखांचा ऐवज जप्त, सात जणांना अटक
भाईंदर : विविध लिंकव्दारे नागरीकांचे मोबाईल हॅक करून लबाडीने ओ.टी.पी. मिळवून फ्लिपकार्टव्दारे मोबाईल खरेदी करून ते अन्य लोकांना विक्री करुन ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भाईंदर पोलीसांकडून पर्दाफाश करण्यात आला.
आय फोन, गुगल पिक्सल, सॅमसंग, विवो, नथींग, पोको, रिअल मी, मोटोरोला अशा नामांकित कंपन्याचे एकुण १०७ मोबाईल व चार लाख रोख रक्कमेसह ५० लाख ५८,४६७ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
मागील महिन्यात सहायक पोलिस निरीक्षक संजय शिंपणे व बिट मार्शल अंमलदार रविंद्र वाघ यांना रिंकुकुमार श्रीरामजीलाल बैरवा (जाटव) हा इसम संशयास्पद स्थितीत गुगल पिक्सल, नथींग आर या कंपन्यांचे ११ मोबाईलसह मिळुन आला होता. त्याप्रमाणे अधिक तपास केला असता नमुद मोबाईल आरोपींनी आपली स्वतःची ओळख लपवून, दुसऱ्या व्यक्तींचे मोबाईल अकाऊंट हॅक करुन, त्यांचे अकाऊंटवरुन फ्लिपकार्ट या ऑनलाईन ॲपवरुन चार लाख ७७,९८९ रुपयांची खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. तदनंतर फ्लिपकार्ट या कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर इंस्टाकार्ट या कंपनीचे अंमलबजावणी अधिकारी जयवंत मते यांच्या तक्रारीवरुन भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.