ठाण्यात मोबाईल ओरल हेल्थकेअर क्लिनिक सुरू

ठाणे: डॉक्टर्स फॉर यू (डीएफवाय) या अग्रगण्य मानवतावादी संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या फिरत्या क्लिनिकचे उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. वर्षा ससाणे आणि डॉ. प्रशांत पाटील, आयडीएचे मानद सरचिटणीस प्रमुख डॉ. अशोक ढोबळे, डॉक्टर्स फॉर यूचे श्री. साकेत झा आणि हेलियनच्या टीम सदस्यांनी केले.

या उपक्रमाचा दरवर्षी सुमारे १४ हजार व्यक्तींना फायदा होईल असा अंदाज असून यामध्ये ९,००० हून अधिक ओपीडी सत्रांचा समावेश असेल आणि दरवर्षी ४० शालेय मौखिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचेल.

हे फिरते मौखिक आरोग्यसेवा क्लिनिक प्रगत दंत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यामध्ये पोर्टेबल डेंटल चेअर, एक्स-रे मशीन, निर्जंतुकीकरण प्रणाली आणि सर्व आवश्यक दंत उपकरणांचा समावेश आहे. नवी दिल्ली (नैऋत्य दिल्ली, वायव्य दिल्ली, गुडगाव, आग्रा आणि नोएडा) आणि मुंबई (आता ठाण्यात) येथे हेलियन सुसज्ज मोबाइल मौखिक आरोग्यसेवा क्लिनिक चालवत आहे.