एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम आणि ठामपा अधिकारी उपस्थित
ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या सहा महिन्यांत १९ नागरिकांचा जीव गेला असून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी केली.
यावेळी खड्ड्यांचे मोजमाप मोजपट्टीने घेऊन एक महिन्यात जर खड्डे भरले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री.जाधव यांनी दिला आहे. ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत त्यांची नावे जाहीर करावीत, असा सल्ला अविनाश जाधव यांनी ठेकेदारांना दिला आहे. यामध्ये कोणत्या बड्या अधिकाराच्या कुटुंबीयांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केला आहे.