कृपाशंकर सिंह यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली: भाजपाने उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामधील एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. एके काळचे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. भाजपात गेल्यानंतर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.