पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी मुंबईत होणार आयएसपीएल: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग

मुंबई गल्ली क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहे. या गल्ली क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन सीसीएस एलएलपी ने २७ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) सुरू करण्याची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची आयएसपीएल चे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएसपीएल पुढील वर्षी 2 ते 9 मार्च या कालावधीत खेळली जाईल आणि मुंबई (महाराष्ट्र), हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), बेंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), कोलकता (पश्चिम बंगाल) आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) असे सहा संघ त्यात सहभागी होतील. ही स्पर्धा टेनिस चेंडूंनी स्टेडियममध्ये क्रिकेटच्या हजारो चाहत्यांसमोर खेळवली जाईल.

 

खेळाडू नोंदणी

1: www.ispl-t10.com ला भेट द्या

2: साइन अप करा आणि अटी व शर्ती स्वीकारा

3: तुमचे प्रोफाइल तयार करा आणि पेमेंट करा

4: युजर आयडी आणि पासवर्डसह तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करा

5: अचूक तपशीलांसह नोंदणी फॉर्म पूर्ण करा

6: स्व-परिचय सह तुमचे क्रिकेट खेळतानाचे 4 व्हिडिओ अपलोड करा

7: चाचण्यांमध्ये सहभागा घेण्यासाठी तुमच्या सोईचे शहर निवडा

8: सबमिट करा आणि तुमची नोंदणी पूर्ण करा

 

खेळाडू निवड प्रक्रिया

भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे आणि प्रवीण अमरे हे निवड समितीचे सदस्य आहेत. परांजपे झोन 1 साठी जबाबदार असतील ज्यात मुंबई, चेन्नई आणि श्रीनगरचा समावेश आहे, अमरे झोन 2 चे कार्यभार सांभाळतील ज्यात बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे.

नोंदणी प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. खेळाडूंना प्रोफाइल आणि कौशल्य संचाच्या आधारावर निवडले जाईल. शॉर्टलिस्ट केल्यास, खेळाडूंना नोंदणी दरम्यान त्यांच्या निवडलेल्या शहरानुसार शहर चाचण्यांसाठी नमूद केलेल्या शहरांमध्ये जावे लागेल.

शहर चाचण्यांच्या तारखा
मुंबई ६ आणि ७ जानेवारी २०२४
चेन्नई १३ आणि १४ जानेवारी २०२४
श्रीनगर १३ आणि १४ जानेवारी २०२४
बेंगळुरू १३ आणि १४ जानेवारी २०२४
हैदराबाद १३ आणि १४ जानेवारी २०२४
कोलकाता ६ आणि ७ जानेवारी २०२४
मुंबईत अंतिम चाचण्या २० आणि २१ जानेवारी २०२४

निवड समिती 350 खेळाडूंची निवड लिलावासाठी करतील. अंतिम लिलाव 11 फेब्रुवारी 2024 रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील सोफिटेल येथे होणार आहे.

 

संघ रचना

प्रत्येक फ्रँचायझीकडे ₹1 कोटीचे पर्स असेल आणि ते जास्तीत जास्त 16 खेळाडू निवडू शकतात. प्रत्येक खेळाडूची मूळ किंमत (बेस प्राईस) ₹3 लाख असेल. खेळाडूंव्यतिरिक्त, प्रत्येक संघात प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर, मालिश करणारा तज्ञ आणि संघ व्यवस्थाप असा सहा सदस्यीय सपोर्ट स्टाफ असेल. सपोर्ट स्टाफची एकूण फी ₹10 लाख असेल. याशिवाय, प्रत्येक संघाला माजी रणजी खेळाडू असलेल्या मार्गदर्शकासाठी ₹15 लाख आरक्षित करावे लागतील.

  

संघ कसा विकत घ्यायचा?

संघाच्या मालकीची बोली 15 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत खुली आहे. बोली लावणाऱ्याने सर्व सहा संघांसाठी बोली लावणे आवश्यक आहे. 21 जानेवारी 2024 रोजी सर्वाधिक बोली लावणाऱ्याला फ्रँचायझी प्रदान केली जाईल. टाय झाल्यास, खुली बोली (ओपन बिड) सर्वाधिक बोली लावणारा ठरवेल आणि त्याला/तिला फ्रँचायझी प्रदान करेल.