ठाणे : ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच आर्थिक आणि संपत्ती व्यवस्थापन करत असलेल्या ग्रो राईट या भारतातील आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, असे कंपनीचे संस्थापक स्वप्नील काळबांडे यांनी ठाणेवैभवशी बोलताना सांगितले.
ग्रो राईट सोल्युशन ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स यासारख्या सेवा पुरवते. आत्तापर्यंत कंपनीने १० हजारपेक्षा जास्त कुटुंबांना तसेच ३५ हजारपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे. ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो असे श्री. काळबांडे म्हणाले.
स्वप्नील काळबंडे हे ग्रो राईट वेल्थ सोल्यूशनचे संस्थापक संचालक आहेत. ते आर्थिक नियोजन मानक बोर्ड इंडिया द्वारे प्रदान केलेले एक आर्थिक नियोजक आहेत. स्वप्नील हे व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. ते देशातील सर्वोच्च आरोग्यविमा योजनाकारांपैकी एक असून भारतातील आरोग्य विमा उद्योगासाठी वार्षिक परिषद सदस्य आहेत. त्यांनी विमा तसेच वित्त क्षेत्रात २५० हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांनी आरोग्य विमा उद्योगात २०२३ चा वार्षिक काउंसिल सीईओ पुरस्कार जिंकला आहे, जो उद्योगातील सर्वोच्च मान्यताप्राप्त म्हणून समजला जातो. श्री. काळबांडे यांनी आर्थिक नियोजनातून महिलांना आर्थिक समावेशाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. आमचा उद्देश ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करणारे गुंतवणूक पर्याय प्रदान करणे हा आहे, असे स्वप्नील काळबांडे यांनी सांगितले.