‘घे भरारी’चा ठाण्यात शॉपिंग धमाका

ठाणे: पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, बंगळुरू, बेळगांव, पनवेल आदी ठिकाणी प्रदर्शने सादर करणाऱ्या ‘घे भरारी’चे प्रदर्शन आता ठाणे येथे समारोह बँकवेट्स, सीकेपी हॉल, एनकेटीटी कॉलेजजवळ होत आहे.

‘घे भरारी’ या दोन लाख ६० हजार सदस्य असलेल्या फेसबुक ग्रुपतर्फे लग्नसराईसाठी खास साड्या, कॉर्पोरेट साड्या, दागिने आणि देण्याघेण्यासाठी असंख्य भेटवस्तू यांचे भव्य प्रदर्शन खास नवव्यावसायिक आणि स्त्री उद्योजिकांच्या सहभागातून ठाण्यात होत आहे. याचे उदघाटन ५ जून रोजी सुप्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. ५ ते ७ जूनपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १ ते रात्री 9 या वेळेत सुरू असेल. यामध्ये लाईफ स्टाईल उत्पादने, हटके, अनोखी उत्पादने असणारे व्यावसायिक ठाणे, मुंबई, पुणे, इंदूर, कोल्हापूरवरून आले आहेत. १००पेक्षा जास्त लहान व्यावसायिक व महिलांनी यामध्ये भाग घेतला आहे.

या प्रदर्शनात अद्वितीय सजावटीच्या वस्तू , अत्युत्तम दागिने, विविध प्रकारचे कपडे, उत्तम परफ्युम्स, हटके कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या असंख्य वस्तू, हॅन्डमेड सोप्स, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या, खाद्यपदार्थ, असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील.

सर्व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी. उत्कृष्ट दर्जा, वाजवी किंमत आणि उत्तम व्यावसायिक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असून ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदय सबनीस यांनी केले.
या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन ‘घे भरारी’ समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे