ठाणे: शिर्डी येथे झालेल्या इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस फेडरेशनच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत महाराष्ट्र संघातून श्री मा विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी पाटील आणि तिच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.
गार्गी ही वाघबीळ येथील रहिवासी असून सौ. रोहिणी या त्यांच्या प्रशिक्षक होत्या. चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत गार्गी पाटील हिने सुवर्णपदक पटकावून राज्याचे, ठाणे शहराचे, वाघबीळ गावाचे आणि आगरी समाजाचे नाव उंचावले आहे.