ठाणे : महाराष्ट्र पोलीस दलातील धाडसी अधिकारी आणि एव्हरेस्ट वीरांगना द्वारका डोखे यांनी आता आणखी दोन अष्टहजारी शिखरे सर करण्याचा निर्धार केला असून यासाठी त्यांनी नागरिकांकडून आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
वयाच्या 50 व्या वर्षी सन 2025 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट, तसेच वयाच्या 51 व्या वर्षी सन 2026 मध्ये माऊंट ल्होत्से आणि माऊंट मनास्लु सर केल्यानंतर डोखे यांचे पुढील लक्ष्य जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाचे माऊंट मकालु आणि सातव्या क्रमांकाचे माऊंट धौलागिरी ही शिखरे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही शिखरांवर त्या ऑक्सिजन मास्कविना भारताचे राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि 150 वर्ष पूर्ण झालेले ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी सुमारे 33 ते 35 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून आर्थिक अडचणींमुळे त्यांना नागरिक, संस्था आणि उद्योजकांकडून सहकार्याची गरज आहे. “देशाचा आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावण्यासाठी ही मोहीम आहे. इच्छुकांनी पुढे येऊन सहकार्य करावे,” असे आवाहन डोखे यांनी केले आहे.
द्वारका डोखे यांच्या या ध्येयासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा हात पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या जिद्दीला आणि देशभक्तीला साथ देण्यासाठी नागरिकांनी उदारपणे योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
Banking Name – Dwarka Vishwanath Dokhe
A/C No. – 33140590833
IFS Code – SBIN0021197
Branch – Mahatma Nagar, NashikGPay / PhonePe No. – 9823564467 या माध्यमांद्वारे थेट आर्थिक सहाय्य करून या प्रेरणादायी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.