दुबार मतदारांपुढे डबल स्टार; निवडणूक यंत्रणा सज्ज

ठाणे-पालघरमधील सहा नगरपरिषदांसह राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका

मुंबई: येत्या रविवारी नगरपालिका निवडणुकांचा प्रचार संपणार असून १ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ तर पालघर जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसह राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या अशा एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्था आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण एक कोटी सात लाख 3576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर () *असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणं आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतल्याचं दिसून येत आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 66,775 इतके अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.