ठाणे: नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. या प्रसंगी अभिजीत दिपके याची भेट घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू, असे आश्वासित केले.
नीट पेपर घोटाळाप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक आणि काॅक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गुरूवारी या आंदोलनात डाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठामपा विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत दिपकेची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.