सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध

अंबरनाथ: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेचा अंबरनाथ तालुका वकील संघटनेमार्फत निषेध करण्यात आला.

सरन्यायाधीश गवई महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्यातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी देखील बार कौन्सिलने केलेली आहे.

उल्हासनगर तालुका बार असोसिएशन सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर कामकाजापासून अलिप्त राहीले तर आज अंबरनाथ तालुका बार असोसिएशनमार्फत या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले.

उल्हासनगर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी बार कौन्सिलने तत्काळ हल्लेखोर वकिलाची सनद रद्द करावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी ॲड मल्लेश चलवादी, ॲड प्रियेश जाधव, ॲड उमेश केदार, ॲड. संदिप पगारे, एडवोकेट रवींद्र सोनवणे, ॲड वैशाली बनसोडे, ॲड. मनिषा तायडे व इतर वकील वर्ग उपस्थित होते.