ठाणे: ४७ व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील दुसऱ्या फेरीत सेंचुरी रेयॉनने मुकंदची ३८ धावसंख्या आठ गडी राखून आरामात ओलांडत आपली विजयी दौड कायम राखली.
यावेळी पावसाचा तडाखा या सामन्याला बसला. सकाळी ठाण्यात झालेल्या पावसाने खेळपट्टी ओलसर झाली. पंच ओजस कर्वे- दशांग तन्ना यांनी सेंट्रल मैदानाची पहाणी केल्यावर दुपारी साडेबाराला प्रत्येकी १५-१५ षटकांचा खेळ होईल असे जाहीर केले.
नाणेफेक जिंकून मुकंदने फलंदाजी स्वीकारली पण आशुतोष माळी (६ धावत ३ बळी), प्रदीप पांडे (२ धावत २ बळी) आणि आनंद भालेराव (२ धावत २ बळी) यांनी मुकंदचा डाव ३८ धावात गुंडाळल्यावर रोशन जाधव ०४) दिनेश यादव (नाबाद १५) यांनी सेंचरीचा विजय सुकर केला. आशुतोष माळीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : ‘क’ गट- दुसरी फेरी मुकंद १०.६ षटकात ३८ (आशुतोष माळी ३-०-६-३, प्रदीप पांडे २-०-२-२, आनंद भालेराव १-०-२-२) पराभूत वि. सेन्चुरी रेयॉन ४.४ षटकात २ बाद ४१ (रोशन जाधव १४, दिनेश यादव नाबाद १५(दोन षटकात)