क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. हे नवीन नाही. १९९९ आणि नंतर २००७ मध्ये हे दोन संघ आमने सामने आले होते. १९९९ मध्ये, सामना टाय झाला असला तरी, चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. २००७ मध्ये, दोन्ही संघ पुन्हा उपांत्य फेरीत आमनेसामने आले आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय प्राप्त केला.
या दोन संघांच्या भोवती थोडासा इतिहास असल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही लढत रोमांचक ठरणार आहे यात शंका नाही. १६ नोव्हेंबरला ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून प्रसिद्ध असेलेले कोलकता या दोन्ही संघांना रिंगणात आणणार आहे. ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका २०२३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवेल?
या विश्वचषकाच्या आवृत्तीत पाचवेळच्या चॅम्पियनला दक्षिण आफ्रिकेच्या हातून १३४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता आणि त्या विजयानंतर नक्कीच दक्षिण आफ्रिका जेव्हा ऑस्ट्रियाशी पुन्हा एकदा भिडतील तेव्हा आत्मविश्वासाने मैदानावर उतरतील.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका १९९२ पासून एकमेकांविरुद्ध १०९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ५० जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेने ५५ जिंकले आहेत, तीन सामने टाय झाले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध चार एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेने सर्व जिंकले आहेत. विश्वचषकात, स्पर्धा ३-३ अशी बरोबरीत आहे.
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | २ | ३ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ५० | ५५ |
भारतात | ० | ४ |
विश्वचषकात | ३ | ३ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची आतापर्यंतची कामगिरी
उपांत्य फेरीत जाताना या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीत फारसा फरक नाही. दोन्ही संघांनी नऊपैकी सात सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने साखळी टप्प्यात त्यांचा तिसरा आणि आठवा सामना गमावला, तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग सात विजय नोंदवले. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेने प्रचंड धावसंख्या उभारण्यात आणि नंतर त्यांचा बचाव करण्यात अधिक सोयीचे प्रदर्शन केले, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला लक्ष्याचा बचाव असो किंवा पाठलाग, दोन्ही बाबीत त्यांना जास्ती अडचण दिसून आली नाही.
सामना क्रमांक | ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका |
१ | भारताकडून ६ विकेटने पराभव | श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव |
२ | दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव | ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव |
३ | श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव | नेदरलँड्सकडून ३८ धावांनी पराभव (४३ षटकांच्या सामना) |
४ | पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव | इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव |
५ | नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव | बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव |
६ | न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव | पाकिस्तानचा १ विकेटने पराभव |
७ | इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव | न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव |
८ | अफगाणिस्तानचा ३ विकेटने पराभव | भारताकडून २४३ धावांनी पराभव |
९ | बांगलादेशचा ८ विकेटने पराभव | अफगाणिस्तानचा ५ विकेटने पराभव |
संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
दुखापती अपडेट्स
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. आपल्या कर्णधार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी फिट होईल अशी प्रोटीजची अपेक्षा असेल. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत एडन मार्कम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल.
खेळण्याची परिस्थिती
कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने येथे एक सामना खेळला आहे ज्यात त्यांना भारताविरुद्ध २४३ धावांनी पराभव पत्करावा लागला. जसा जसा सामना पुढे सरकेल तशी तशी खेळपट्टी मंदावण्याची अपेक्षा आहे. फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते.
हवामान
हवामानात काही ढग आणि सूर्य दिसण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. ६४% ढगांचे आच्छादन आणि २% पावसाची शक्यता असेल. उत्तर-ईशान्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने नऊ सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राईक रेटने ४९९ धावा केल्या आहेत.
अॅडम झम्पा: ऑस्ट्रेलियाचा लेग-स्पिनर मधल्या षटकांमध्ये प्रभावी ठरला कारण त्याने धावांच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवले आणि त्याच वेळी विकेट्स घेतल्या. त्याने नऊ सामन्यांमध्ये २२ विकेट्स पटकावल्याआहेत.
क्विंटन डी कॉक: दक्षिण आफ्रिकेच्या डावखुरा सलामीवीर आणि यष्टीरक्षकाने नऊ सामन्यांत चार शतकांसह ५९१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६६ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १०९ आहे.
मार्को यानसन: दक्षिण आफ्रिकेच्या उंच डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी केली आणि आठ सामन्यांत १७ बळी घेतले. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो उपयुक्त ठरला असून त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे.
आकड्यांचा खेळ
- तबरेझ शम्सी त्याचा ५० वा एकदिवसीय सामना खेळेल
- डेव्हिड वॉर्नरला (६) विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माची (७) बरोबरी करण्यासाठी एका शतकाची आणि विश्वचषकात १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९ धावांची गरज आहे.
- मार्कस स्टॉइनिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १३ धावांची गरज आहे
- ग्लेन मॅक्सवेलला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी १०२ धावांची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १६ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: ईडन गार्डन्स, कोलकता
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)