क्रीडा
ना १९९९, ना २००७, दक्षिण आफ्रिका २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मात देईल?
क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. हे नवीन नाही. १९९९ आणि नंतर २००७ मध्ये हे दोन संघ आमने सामने आले होते. १९९९ मध्ये, सामना टाय झाला असला तरी, चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. २००७ मध्ये, दोन्ही संघ पुन्हा उपांत्य फेरीत आमनेसामने आले...