बदलापूर : अखेर बारवी धरण आज सोमवारी पहाटच्े या समु ाराला ओसंडू न वाहू लागल्याने गेल्या अ नेक दि व स ांप ा सून ध र ण कधी भरणार याची लागलेली
प्रति क्षा अखेर संपली आहे. ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागवली जाण्याबरोबरच औद्योगि क पट्ट्याच्या पाण्याची चि ंता आता दूर झाली आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याची पातळी खाली गेली होती. जुलै महिन्यात पावसाचे पहिल्याच आठवड्यात जोरदार आगमन झाल्याने जुलै अखेरीला 73 टक्क्यांवर पाणीसाठा झाला होता. त्यानंतर देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या दमदार हजेरीमुळे 6 ऑगस्ट रोजी धरणात 97.34 टक्के तर लगेच 9
ऑगस्टला सायंकाळी जलसाठा 99.88 टक्क्यांवर पोहोचला होता. आणि अखेर सोमवारी 10 ऑगस्ट रोजी धरण ओव्हर फ्लो झाल्याने ठाणे, कल्याण, डोंबि वली, उल्हासनगर, अं बरनाथ, बदलापूर आदी शहरातील एमआयडीसीतील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने बारवी नदीकि नारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दि ला आहे.
जुलैमध्ये धरणात पाण्याचा 50 टक्क्यांपर्यंत पाणी साठा झाला असताना धरणाच्या स्वयंचलि त दरवाज्यातून पाणी गळती होत असल्याची बाब निदर्शनाला आली होती. एमआयडीसीने त्वरेने उद्भवलेल्या समस्येची दखल घेऊन दुरुस्तीचे काम के ल्याने वाया जाणाऱ्या पाण्याची नासाडी रोखली त्यामुळे उर्वरित पाणीसाठा सुरक्षि त
ठेवण्यास यश मि ळाले.