मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्य ांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन
मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीसर्व स्तरावरील अधिकाऱ्य ांना एकमहिन्याचा अल्टिमेटम दि ला आहे.
एक महिन्याच्या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दि सून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्य ांवर बदली, पदावनती अथवा निलंबनासारखी कठोर
शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही के वळ वाहतूक सवे ा नसनू राज्यात ील सर्वसामान्यांची जीवनवाहि नी आह.े शासनाने कर्मचाऱ्यां च्या प्रलंबित आर् थिक मागण्या मान्य करून मोठा दि लासा दि ला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधि कारी वर्गा नेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आह.े के वळ बैठका घेऊन कि ं वा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दि सला पाहिज े. यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. वर्षात ील सर्वाधि क उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महि न्यांत ील ही घसरण गंभीर असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यात ील ३१ पैकी २१ वि भाग तोट्यात जाणे ही व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्मा ण करणारी बाब असल्याचे त्यां नी नमूद केले.
एसटीची आर् थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधि कारी वर्गा ने आता निकाल देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यां ना संपूर्ण पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता,
उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. एक महिन्या नंतर कामगि रीच्या आधारे निर्ण य घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदावनती
कि ं वा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दि ला.