उत्तर प्रदेशातून ४८ तासांत सुटका
ठाणे : मुंब्रा येथून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली, एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाचा अवघ्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशातील लखनऊ व कानपूर परिसरातून शोध घेत, मुंब्रा पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची उकल के ली. सीसीटीव्ही फु टेज, मोबाईल लोके शन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
मुंब्रा पोलिस ठाण्यात २६ जून रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या मध्ये झोया (१५), कशीश (१५), प्रि या (१७), मुझमील (१३) आणि मोहम्मद (२०) ह े २५ जनू रोजी क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मुझमीलचा वाढदि वस साजरा करण्यासाठी ते एकत्र गेल्यानंतर उशि रापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे झोयाच्या आईने मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रा र दाखल केली. गुन् ह् या चे ग ांभी र्य ल क्षात घेऊन ठाणे शहर पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक
पोलिस आयुक्त प्रिया डमाळे आणि वरिष्ठ पोलिस नि रीक्षक अनि ल शि ंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वि शेष तपास पथके तयार करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गंगावणे यांच्याकडे तपास सोपवि ण्यात आला.
तपासादरम्यान मुंब्रा, घाटकोपर, कुर्ला आणि कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फु टेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच कशीश सय्यद हिच्या
मोबाईलचे लोके शन उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आढळून आले. त्या नंतर वरिष्ठ पोलिस नि रीक्षक अनि ल शि ंदे यांनी सहाय्यक पोलिस नि रीक्षक वि नायक माने यांच्या नेतृत्वाखाली वि शेष पथक तातडीने लखनऊला रवाना केले.
लखनऊ येथील ऐशबाग रेल्वे स्थानक ते चौक मंडी परिसरातील सीसीटीव्ही फु टेज आणि तांत्रिक तपासाच्या आधार े झोया शेख, कशीश सय्यद, प्रिया गुप्ता आणि मोहम्मद कै फ खान यांना सुखरूप ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अल्पवयीन मुझमील रेहबत खान याचा शोध ठाणे शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने कानपूर रेल्वे पोलिसांच्या मदतीने घेत त्यालाही सुरक्षित ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अवघ्या दोन दि वसांत पाचही बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मुंब्रा पोलि सांना यश आले असून, पुढील तपास सुरू आहे.